परतूर ,मंठा, नेर ,सेवली मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्यात येऊन शिवसेना मोहन अग्रवाल यांना उमेदवारी द्या : माजी आमदार अर्जुन खोतकर यांना साकडे
परतुर /मंठा नेर सेवली भागातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना नेते व विभागीय नेते अर्जुनराव खोतकर यांची जालना येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने हा मतदारसंघ सात ते आठ वेळेस निवडणूक लढविलेले आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी पेक्षा शिवसेनेला पोषक वातावरण आहे तसेच भाजपाला सात ते आठ वेळेस उमेदवारी दिली असता यावेळेस शिवसेनेला देणे यात गैर काय आहे? मोहन अग्रवाल हे उच्चशिक्षित असून त्यांना सर्व भाषेचे ज्ञान आहे सर्व सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या सोबत आहेत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून मतदार संघामध्ये त्यांनी शेकडो कोटी रुपयांचे विकास कामे केलेले आहेत
तसेच शिवसेनेच्या संघटनमक बांधणी प्रत्येक गावात बूथ प्रमुख, शिवदूत,योजना दूत,शिवसेना सभासद नोंदणी,पदाधिकारी, कार्यकर्ते, शाखाप्रमुख,शिवसेना शाखा कार्यकारणी, आशा पद्धतीने शिवसेनेची मतदार संघामध्ये बांधणी करण्यात आलेले आहे, आणि लोकांचा शिवसेनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असून शिवसेनेमध्ये दररोज मतदार संघातील प्रवेश सोहळे सुरूच असतात, आणि भारतीय जनता पार्टी पेक्षा शिवसेनेला हा मतदारसंघ निवडून येणे अत्यंत सोपे आहे आगामी काळात महाराष्ट्र राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आणयाची असल्यास हा मतदारसंघ शिवसेनेला सोडणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून ह्या सर्व भावनांचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आमच्या भावना कळवण्यात याव्यात अशी विनंती अर्जुनराव खोतकर यांना निवेदनाद्वारे केलेली आहे. या कार्यक्रमास जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे दलिता गाडी जिल्हाप्रमुख भास्कर मगरी उपस्थित होते.