मार्च अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर १ सादर करण्याचे आवाहन
न्यूज जालना दि. 31–
सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग , व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार , व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये ( रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे ) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार त्रैमासिक विवरणरपत्र ई-आर १ माहे मार्च २०२1 तिमाही संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत (३० एप्रिल पंर्यत ) सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रमाणे नियोक्त्यांची मार्च 2021 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत सादर करावे. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन एम्प्लॉयर ( लीस्ट अ जॉब ) वर क्लीक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई-आर १ या ऑप्शनवर क्लीक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनीक सुटया वगळून सकाळी १०.०० ते सांयकाळी 6.00 वाजेपर्यत (०२४८२) २२५५०४ या कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करावा.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० मधील तरतुदी नुसार वरील प्रमाणे सर्व आस्थापनांनी 31 मार्च २०२1 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहीती ई-आर १ विवरणपत्र ३० एप्रिल २०२१ पुर्वी वरील वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे, यात कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशिर कारवाई होऊ शकेल, याची नोंद घ्यावी असे संपत चाटे, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी कळविले आहे.