डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त २ मार्च रोजी जालना शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी महास्वच्छता अभियान…

जालना ; (दिनांक : २७/०२/२०२५) जालना जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक २ मार्च २०२५ वार रविवार रोजी आदरणीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने श्रीसदस्य स्वयंसेवक यांच्यावतीने व जालना महानगरपालिकेच्या सहकार्याने आदरणीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील बस स्थानक परिसरात ,भोकरदन नाका रोड तसेच राजुर रोड व ढवळेश्वर या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा बाजू व परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. याबरोबर याच दिवशी जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ, वाटुर ,अंबड ,कुंभार पिंपळगाव येथील परिसरातही श्रीस्वयंसेवकाच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या महास्वच्छता अभियानाच्या पाठीमागील उद्देश असा आहे की, समाजामध्ये स्वच्छतेची जागृती निर्माण होईल, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच प्रत्येक परिसर हा स्वच्छ राहावा म्हणून प्रशासकीय कार्यालयाच्या परिसरात तसेच वाहतूक मार्ग स्वच्छ करून, विविध परिसर नैसर्गिकदृष्ट्या पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड तसेच परिसर स्वच्छता हे कार्य या प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी करण्यात येत आहेत. याही वर्षी दिनांक ०२ मार्च २०२५ वार रविवार रोजी सकाळी ०९:३० ते ११:३० या वेळेत जालना जिल्हयासहित संपूर्ण भारतभर महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. तरी जालना शहरातील महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने व इतर स्वयंसेवी संस्थेच्या वतीने सहकार्य करून या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले आहे….