न्यूज जालना/प्रतिनिधी
लोधी मोहल्ल्यात सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये दगडफेक झाली होती ,त्यामुळे या भागात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र अवघ्या दहा मिनिटात पोलीस घटनास्थळावर पोहोचले आणि जमावाला पांगविण्यासाठी गोळीबारही केला .त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. मात्र एका जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या दगडफेक प्रकरणी दोन्ही समाजातील 28 व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
सरकार तर्फे कदीम जालना पोलिस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की ,सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास लक्ष्मीनारायणपुरा भागात ्यांच्या सहकार्यांसह पेट्रोलिंग करीत असताना एका व्यक्तीचा फोन आला, आणि दोन्ही समाजात तुफान दगडफेक सुरू असल्याची माहिती दिली. ही माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या आदेशानुसार दहा मिनिटांमध्ये घटनास्थळावर दाखल झालो .त्यावेळी दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव जमलेला होता. आणि त्यांच्या हातामध्ये लाकडी दांडे, तलवारी, दगड असे साहित्य होते. सुरुवातीला ध्वनिक्षेपकावरून जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले मात्र जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. आणि तो पोलिसांच्या दिशेने चालत येत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी आणि इतर ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळावर दाखल झाले. या दगडफेकीत मध्ये दोन पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. जमाव प्रक्षोभक असल्यामुळे त्यांनी रस्त्या मध्ये असणाऱ्या वाहनांची देखील तोडफोड केली .
दरम्यान धीरज राजू राजपूत व समीर जाफर यांच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून ही दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या 28 व्यक्तींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे. आज आज सकाळपासूनच लोधी मोहल्ला भागामध्ये तणावाचे वातावरण आहे मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.