विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १०१ जणांची अँटीजेन तपासणी
कुंभार पिंपळगावात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांची कोरोना तपासणी करताना.(छाया.कुलदीप पवार)
१ जणांचा अहवाल आढळला पॉझिटिव्ह
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे शनिवारी दुपारी ग्रामपंचायत, आरोग्य व पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त पथकांकडून येथील मुख्य रस्त्यावर विनाकारण रिकामटेकड्या फिरणाऱ्या १०१ जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली आहे.यापैकी एका जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा यांची आस्थापने सुरू असतात.दरम्यान या वेळेत बाजारपेठेत गर्दी होत असते.काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असतात.त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या ची अँटिजेन तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.त्यामुळे अँटिजेन तपासणी करण्यात आली.यावेळी घनसावंगी चे तहसीलदार नरेंद्र देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पतंगे,सरपंच प्रतिनिधी अनवर पठाण ,मंडळ अधिकारी एस. बोटवे ,वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा कोकणे, डॉ घोगरे, सह उबाळे, तलाठी एस ऐवतीवड, कोतवाल सोमनाथ लोंढे यांच्यासह ग्रामपंचायत आरोग्य कर्मचारी शिंदे उपस्थित होते.