घनसावंगी तालुका
हलक्याशा वादळी वाऱ्याने विद्युत पुरवठा विस्कळीत
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कुंभार पिंपळगाव सह परीसरातील काही गावांमध्ये हलक्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे.हा विद्युत पुरवठा खंडित होण्यामागे पाऊस,व वारे जबाबदार असल्याचे महावितरण कंपनी कडून सांगण्यात येत आहे.वारंवार विज वाहिन्यांमध्ये बिघाड होत असल्याने रात्र अंधारात काढावी लागत आहे.त्यामुळे ग्रामस्थांना रात्री अंधाराशी सामना करावा लागत आहे.परीसरात दिवसेंदिवस विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी झाड्यांच्या फांद्यामुळे देखील विद्युत तारांचा घर्षण होत आहे.याकडे महावितरण ने लक्ष देण्याची मागणी होत आहे.