घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावात जनावरांचा आठवडी बाजार भरण्यास सुरुवात

कुंभार पिंपळगाव येथे भरलेला जनावरांचा आठवडी बाजार

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील सलग पाच महिन्यापासून बंद असलेला जनावरांच्या आठवडी बाजार भरण्यास बुधवार पासून सुरुवात झाली. या बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते.त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होते.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे संचारबंदी लागू करावी लागली.या काळात व्यवहार सगळे बंद असल्याने व्यापाऱ्यासह नागरीक अडचणीत सापडले होते.शिवाय आठवडी बाजार बंद असल्याने आर्थिक व्यवस्था कोलमडली होती. कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला आठवडी बाजारही सुरू झाले आहेत.गेल्या पाच महिन्यांपासून बाजार बंद होता. त्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!