जालना जिल्ह्यात उद्या ह्या ठिकाणी चालू असेल लसीकरण
जालना जिल्ह्यासाठी कोव्हीशिल्डचे 21 हजार तर कोव्हॅक्सिन लसीचे 8 हजार डोसेस प्राप्त
जालना, दि. 29 :- जालना जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे 21 हजार डोसेस प्राप्त झाले असुन या डोसचे जिल्हयातील सर्व ग्रामीण प्रा.आ . केंद्राना व शहरी पाणीवेस, रामनगर व नुतन वसाहत प्रा.आ. के यांना वाटप करण्यात आहे. सदरील लस 18 वर्षा वरील वयोगटातील पहिल्या व दुसऱ्या डोससाठी दिली जाणार आहे. दुसऱ्या डोसचे अंतर 84 दिवसाचे आहे. त्यामुळे कोविन पोर्टलप्रमाणे ज्याचा दुसरा डोस 84 दिवसानंतर येईल त्यांनीच लसीकरण केंद्रावर यावे. तसेच कोव्हॅक्सिन लसीचे 8 हजार डोसेस प्राप्त झाले असुन त्याचे वाटप जिल्हयातील सर्व ग्रामीण रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय जालना, शहरी पाणीवेस , रामनगर, नुतन वसाहत प्रा.आ. के यांना वाटप करण्यात आले आहे.
दि.22 जुन 2021 पासुन जिल्हयातील सर्व कोव्हीशिल्ड लसीकरण केंद्राच्या ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्याना 50 टक्के स्पॉट नोंदणी करुण लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. गरोदर माता व स्तनदा माता यांचे लसीकरणही जिल्हयात सुरु झाले आहे.
लसीपासुन वंचित असलेले 18 वर्ष व अधिक वयोगटातील सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करुण घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. परदेशी जाणाऱ्या नागरीकांसाठी कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी नुतन वसाहत, जालना येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा डोस कोविशिल्ड लसीचा पहीला डोस घेतल्या नंतर कमीत कमी 28 दिवसाचा कालावधी झालेला असल्यानंतरच देण्यात येईल. सदरील डोस घेण्यासाठी परदेशी नौकरीस्तव व शैक्षणिक कारणास्तव तसेच ऑलम्पिक मध्ये भाग घेण्यास जाण्यासाठी इच्छुक नागरिकांनी आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना येथुन प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
लसीकरण केंद्रावर सोशल डिसटन्स या नियमाचे पालन करावे लसीकरण केंद्रावर गर्दी करुनये लस घेतल्यानंतर लाभार्थ्यानी खालील त्रिसुत्रीचा वापर करावा. मास्कचा नियमित वापर करावा. सॅनिटाझर नियमित वापरावे, हात नियमित धुवावेत असे आवाहनही आरोग्य विभगामार्फत करण्यात आले आहे.