जिल्ह्यात कोविड रुग्णांत होतेय वाढ; एकाच दिवशी १८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
जिल्ह्यात 18 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना दि. 02 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 06 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यात – जालना शहर-4, मोहाडी-1, मंठा तालुक्यातील –निरंक, परतुर तालुक्यातील – घोन्सी तांडा 1, घनसावंगी तालुक्यातील –निरंक अंबड तालुक्यातील –निरंक, बदनापुर – तालुका आन्वी 2, शेलगाव 3, जाफ्राबाद तालुक्यातील –जाफ्राबाद 1, चिंचखेडा 1, भोकरदन तालुक्यातील – शिपोरा बाजार 1, इतर जिल्ह्यातील – झाशी 1, मनमाड 1, नाशिक 1, लखनऊ 1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 18 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 18 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.