दिवाळी अंक २०२१
जालना: त्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांनी दिले हे स्पष्टीकरण !
न्यूज जालना:- रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते ह्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याबाबत दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं असून सांड या शब्दाचा अर्थ काँग्रेस नेते काहीही घेत असतील तर माझ्या वक्तव्याचा ते विपर्यास करत असून तो काँग्रेस वाल्यांचा जुना धंदा आहे अशी सारवासारव दानवे यांनी केली .
आज या प्रकरणावरून जालन्यात काँग्रेसच्यावतीने दानवे यांचा पुतळा जाळण्यात आला . त्यावरून स्पष्टीकरण देताना दानवे म्हणाले की शेतकऱ्यांच्या सोबत बदनापूर येथे संवाद साधत असताना काम करणारा बैल , आणि काम न करणारा बैल असे बोललो होतो . परंतु काँग्रेस वाल्यांनी त्यामध्ये राहुल गांधीचे नाव जोडले .हा काँग्रेस वाल्यांचा जुना धंदा असल्याचे सांगून सारवासारव दानवे यांनी केली .