दिवाळी अंक २०२१

जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांची उच्चस्तरीय चौकशी करणे व पोलीस खात्याला कलंकित करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात यावे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना,विक्रांत देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या माध्यमातून गोर सेनेच्या वतीने निवेदन सादर:

बबनराव वाघ, उपसंपादक

images (60)
images (60)

जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी मागील काळापासून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सर्वसामान्य जनता व पोलीस स्टेशनच्या कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या महिला कुटुंबीयांसोबत गैरकृत्य करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यम व समाज माध्यमातून प्रसारित होत आहेत.या प्रकरणात पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी धाक व पैशाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून त्यांच्या अनैतिक संबंधाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे.करिता या प्रकरणात खालील बाबीवर बारकाईने चौकशी करून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जलद गतीने कार्यवाही व्हावी ही विनंती.

1)समाज माध्यम व प्रसिद्धी माध्यमात प्रसारित अत्याचार प्रकरणा नंतरच पोलीस निरीक्षक बल्लाळ हे आजारी कसे काय पडले?

2)पोलीस निरीक्षक बल्लाळ आजारी पडले तर मग त्यांनी स्वतः गोंदी पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद घेतली किंवा नाही याबाबत चौकशी करणे?

3)पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी ठाणे अंमलदार यांना फोन करून मी आजारी आहे व औषधे उपचारासाठी जात आहे अशी नोंद घ्या असे सांगणे कायदेशीर आहे काय?

4)पोलीस निरीक्षक बल्लाळ हे गोंदी पोलीस स्टेशन चे ठाणे इन्चार्ज असून त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एखाद्या कुटुंबाप्रमाणे वागवणे गरजेचे असताना व्याभिचार करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत त्यांचे घरात अवेळी घुसणे व त्यांचे पत्नी सोबत अनैतिक संबंध ठेवणे कितपत योग्य आहे का?

5)या प्रकरणात पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्यामुळे पोलीस खात्याची वर्तमानपत्र,यूट्यूब व साम टीव्ही वर बदनामी झाली. सबद पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्यावर दंडात्मक व सजा अशी दुहेरी कारवाई करणे गरजेचे आहे.

6)पोलीस निरीक्षक बल्लाळ हे स्वतः आजारी असल्याचे भासवून रजेवर जातात व सदर रजेच्या मुदतीत स्वतः प्रसार माध्यमांना मुलाखत देऊन खोटेनाटे स्पष्टीकरण देऊन शासनाची व सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल का करतात?याची चौकशी व्हावी.

7)पोलीस निरीक्षक बल्लाळ खरोखरच आजारी आहेत अगर कसे व कोणत्या आजाराने आजारी व रजेवर आहेत हे ते कर्तव्यावर हजर होताच त्याची मेडिकल बोर्ड समोर तपासणी करून अहवाल प्राप्त करून चौकशी व्हावी.

8)या प्रकरणातील पोलीस कर्मचारी संदीप राठोड हा व्यसनाधीन आहे.असे पोलीस निरीक्षक बल्लाळ सांगतात तर त्यांच्यावर तो सुधारण्यासाठी त्यांनी काय काय कार्यवाही केली याचा खुलासा व्हावा.

9)या प्रकरणातील पोलीस कर्मचारी दारूच्या व्यसनाधीन आहे हे माहीत असताना सुद्धा त्याची रायटर म्हणून नेमणूक पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी का केली.पोलीस निरीक्षक बल्लाळ नाईट राउंड ला स्वतः न जाता पोलीस कर्मचारी संदीप राठोड व ड्रायव्हरला पाठवत होते अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षक बल्लाळ यांचे हस्ताक्षरामध्ये नाईट राउंड वर गेल्याची व परत आल्याची नोंद घेतली आहे अगर कसे याची चौकशी व्हावी.

10)डिव्हिजन नाईट राउंड च्या वेळी अंबड,घनसावंगी व गोंदी पोलीस स्टेशन डायरीमध्ये स्वतःच्या हस्तक्षरामध्येच पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी नोंदी नोंदविल्या आहेत किंवा कसे जर नोंदी घेतले असतील तर ते ड्रायव्हर व रायटर राठोड यास पाठवून स्वतः रायटर राठोड यांच्या घरी अनैतिक संबंधाकरिता जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.याची सखोल चौकशी करण्यात यावी.

11)रायटर संदीप राठोड यांचे या प्रकरणामुळे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.तसेच त्यांच्या जीवित्वास धोकाही संभव आहे.सबब या कामी योग्य त्या उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात.

12)तारीख-29/08/2022 रोजी छापा टाकण्यासाठी काही कर्मचारी तीर्थपुरी येथे पाठवून पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी गोंदी पोलीस स्टेशनची पोलीस डायरी स्वतःच्या ताब्यात घेतली.यावेळी ते पोलीस स्टेशनला हजर नव्हते.या कामी गोंदी पोलीस स्टेशन ची सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून,सखोल चौकशी व्हावी.

याकरिता वरील सर्व बाबीची सखोल चौकशी करून होत असलेली पोलीस खात्याची मलीन प्रतिमा करणाऱ्या अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी या मस्तवाल पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे ही विनंती.

या कामी पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना बडतर्फ न केल्यास गोर बंजारा समाज रस्त्यावर उतरेल व तीव्र आंदोलन करेल या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास शासन-प्रशासन जबाबदार राहील,याची नोंद घ्यावी.

या निवेदनावर नामदेव पवार प्रदेशाध्यक्ष गोरसेना,प्रल्हाद जाधव,प्रवीण पवार,कैलास राठोड,गबरू राठोड,गोपाल राठोड,बाबासाहेब राठोड,पंडित राठोड,अनिल राठोड,कपूरचंद राठोड,संजय राठोड,रमेश राठोड,प्रल्हाद राठोड,संजय पवार,कैलास राठोड,चुनीलाल चव्हाण,विठ्ठल चव्हाण,विलास जाधव,सुभाष चव्हाण सह अनेक गोर सेना पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!