जालना जिल्हा पोलिस दलात मोठी खांदेपालट
जिल्ह्यातील प्रमुख पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या
■ जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी केले मोठे फेरबदल
तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांची चंदनझीरा पोलीस ठाण्यात बदली.
जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांची मंठा पोलीस ठाण्यात बदली.
सायबरचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांची तालुका पोलीस ठाण्यात बदली.
पोलीस नियंत्रण कक्षात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक एम . ए .सैय्यद यांची शहर वाहतूक शाखेत, पोलीस निरीक्षक जी.एस. शिंदे यांची सायबर पोलिस ठाणे , तर पोलीस निरीक्षक बी. एन. रयतुवार यांची जिल्हा वाहतूक शाखेत नेमणूक करण्यात आली आहे.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांची जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर परतुर पोलिस ठाण्यातील सपोनि रवींद्र ठाकरे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांची स्थानिक गुन्हे शाखेत, सदर बाजार पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांची पारध, उपनिरीक्षक गणेश झलवार यांची भोकरदन, मंठ्याचे उपनिरीक्षक नितीन गट्टूवार यांची परतुर, जाफराबादचे नितीन काकरवाल यांची सदर बाजार, युवराज पोटरे यांची चंदनझिरा आणि चंदनझिरा पोलीस ठाण्यातील सुनील इंगळे यांची कदीम जालना पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
जिल्ह्याबाहेरून बदलून आलेल्या पोलीस अधिका-यांनाही विविध ठिकाणी नेमणुका देण्यात आल्या आहेत. यामध्ये सपोनि. गोरख शेळके- परतुर, उपनिरीक्षक बी.पी. राऊत- मंठा, उपनिरीक्षक बी. डी. कुटुंबरे- सदर बाजार, गणेश राऊत- चंदंनझिरा, संदीप सोळंके- अनैतिक मानवी व्यापार विरोधी शाखा, प्रल्हाद मदन-जाफराबाद, एस. यु. मरळ- कदीम जालना, यु.ए. टाकसाळ- घनसावंगी, व्ही. जे. शिंदे- शहर वाहतूक शाखा, प्रदीप डोंगरे-घनसावंगी, राहुल पाटील- बीडीएस आणि एटीसी, योगेश चव्हाण- जाफराबाद आणि सतीश दिंडे यांची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.