घनसावंगी तालुका
जांबसमर्थसह परीसरात खंडीत विजपुरवठामुळे ग्रामस्थ वैतागले
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
कुंभार पिंपळगाव येथील महावितरण उपकेंद्राचे दुर्लक्ष; वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थसह परीसरात वारंवार होणाऱ्या विजपुरवठा खंडीतामुळे ग्रामस्थ वैतागले असून रात्र अंधारात काढावी लागत आहे.याकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
पाऊस नसतानाही वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामस्थांना रात्री मच्छरांशी सामना करावा लागत आहे. एक एक तास विजपुरवठा गुल होत असल्याने ग्रामस्थांकडून महावितरणविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.यासंदर्भात वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वारंवार खंडित होणारा विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.