महापुरुषांच्या विचार आत्मसात करण्याची गरज- शिवशाहीर अरविंद घोगरे
जालना /प्रतिनिधी
माणूस हा समाजशील प्राणी आहे.महापुरुषांचे जयजयकार करण्याऐवजी त्यांचे विचार आत्मसात करणे आता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जालना शाखेच्या वतीने आयोजित सन्मान व वार्तालाप कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय शिवशाहीर व मराठवाडा लोकविकास मंच पुरस्कार प्राप्त शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी दिनांक ३० नोव्हेंबर मंगळवार रोजी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, शाहीरबाणा सहकारी ज्ञानेस जाधव यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना शिवशाहीर घोगरे म्हणाले की,तरुणांनी जीवनात वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे.कारण वेळेचे भान नसलेले कधीही यशस्वी होऊ शकत नाही. येणाऱ्या संधीची वाट पाहू नका संधी जीवनात निर्माण कराव्या लागतात.असे त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी जिवनातील अनेक गोष्टी यावेळी सांगितल्या. दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला
पार्श्वभूमी नसताना शाहिरीबाणाची सुरवात:-
शाहिरी बाणा सुरू करताना लागणारे सहकारी यांना कुठलेही पार्श्वभूमी नसताना सर्व बाबी मेहनतीच्या जोरावर शिकून आज महाराष्ट्रभर आम्ही शाहिरीबाणा हा चालवत आहे .