जालना शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु.
जालना दि. 8 :- शैक्षणिक वर्ष 2021 -22 साठी जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना, अंबड, भोकरदन, बदनापुर, घनसावंगी व संत रामदास मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जालना, भोकरदन, अंबड, मंठा असे एकुण 10 शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी व विद्यार्थ्यीनींसाठी मोफत प्रवेश सुरु झाले असुन मागासवर्गीय गरजु व वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
इयत्ता 8 वी पासून पुढील वर्ग सुरु झाले असल्याने, मागासवर्गीय मुलां- मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणा-या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थींनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यालये व महाविद्यालयांमध्ये प्रवेशित असलेले मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशाचे अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतिगृहातील गृहपाल व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जालना या कार्यालयाशी 02482- 225172 संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना सांगितले आहे.