कोरोना अपडेट

जालना:कोरोना बाधीत रुग्णसंख्येत वाढ; एकाच दिवशी ३५ जण पॉझिटिव्ह

जालना : सलग दुसऱ्या दिवशी रविवारी जिल्ह्यातील ३५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . यात जालना शहरातीलच २५ जणांचा तर अंबड येथील ०७ जणांचा समावेश आहे .

images (60)
images (60)

दोन दिवसातच ५८ रूग्ण आढळले असून , वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरू लागली आहे . जिल्ह्यात सध्या १३१ सक्रिय रूग्ण आहेत . जालना जिल्ह्यातील ३५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी प्राप्त अहवालांतून समोर आले होते . यात जालना शहरातीलच २५ जणांचा समावेश होता .तर अंबड ७,जाफराबाद १,बुलढाणा २ असे एकूण ३५ जणांचा समावेश आहे

तर दुसऱ्याच दिवशी रविवारी तब्बल ३५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . डिसेंबरपर्यंत पाच – दहाच्या आत राहणारी दैनंदिन बाधितांची संख्या आता ३५ वर गेल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे . बाधितांमध्ये जालना शहरातील ३५ जणांचा समावेश आहे . अंबड तालुका ०७ पॉझिटिव्ह आढळुन आले आहे.दरम्यान , जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६२ हजार २७३ वर गेली असून आजवर १,२०२ जणांचा मृत्यू झाला आहे .दरम्यान सध्या उपलब्ध बेड हे १८५१ आहे तर फक्त ५ बेड हे अधिग्रहित बेड असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी सांगितले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!