सावधान ! जालन्यात आढळला ओमयक्रानचा पहिला रुग्ण.
जालना : जालना शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाची झोप उडाली असतानाच आज रविवारी जालना जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढलून आल्याने प्रशासना समोरील अडचणीत भर पडली आहे. दुबई येथून जालन्यात १ जानेवारी रोजी परतलेल्या एका व्यक्तीचा लाळेचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. सदर अहवाल आज रविवारी ओमायक्राँन बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात मागील बारा दिवसांपासून कोरोनाच्या रूग्ण ( Corona Patient ) संख्येत भर पडत आहे . त्यात रविवारी ( ता.नऊ ) जिल्ह्यात पहिला ओमिक्रॉनचा रूग्ण आढळून आला . हा रूग्ण दुबई येथून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . विवेक खतगावकर यांनी दिली आहे .
सदर्भित रुग्णांची दोन जानेवारी रोजी या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली होती . त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला . मात्र , त्याला कोणताही त्रास नव्हता . सदर रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याचे आरोग्य यंत्रणेला सांगितले . मात्र , तो रूग्ण रूग्णालय दाखल न होता होम क्वारंटाईन झाला . दुबई येथून आल्याने व कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने त्या रुग्णांचे नमुने ओमिक्रॉन विषाणू चाचणीसाठी पाठविले होते . त्याचा अहवाल रविवारी ( ता.नऊ ) प्राप्त झाला असून त्या रुग्णाला ओमीक्रॉन विषाणूची लागण झाल्याचा अहवाल आला आला . त्यामुळे आता होम क्वारंटाईन असल्याने तो रुग्ण किती जणांच्या संपर्कात आला आहे , याची माहिती आरोग्य विभाग संकलित करत आहे , अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . विवेक खतगावकर यांनी दिली आहे .