जालन्यात रेशीम कोषाला मिळतोय प्रतिक्विंटल 73 हजार 500 रुपये भाव
जालना /प्रतिनिधी
जालना येथील रेशीम बाजारात सध्या रेशीमला प्रतिक्विंटल 73 हजार पेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या मराठवाडा आणि विदर्भातून मोठ्या प्रमाणावर रेशीम कोषाची बाजारात आवक होत आहे.माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या पुढाकारातून जालना शहरात रेशीम बाजारपेठ निर्माण करण्यात आली. त्यानंतर मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांना रेशीम शेतीची ओढ लागली.यातून अनेक शेतकरी एकरी लाखोंचे उत्पादन घेऊ लागले. सध्या या रेशीम बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रेशीम कोषाची आवक होत आहे.सध्या या रेशीम कोषाला प्रतिक्विंटल 73 हजार पाचशे रुपये तर प्रति किलो 735 रुपये इतका भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळला.तीन एकर तुती लागवड केल्यानंतर वर्षअखेरीस त्यामध्ये सुमारे सहा लाखांचे उत्पादन घेतल्याच गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हटले आहे. तर सध्या रेशीम बाजारात चांगली आवक असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले आहे.