महिलेने सराफा दुकानातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या, घटना सीसीटीव्हीत कैद
जालना प्रतिनिधी
दागिने पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या एका महिलेने सराफा दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केलाय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाले असून चोरी करणाऱ्या महिला विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जालना शहरातील राजकमल ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलेने तब्बल एक लाख दहा हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्यात. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सराफा व्यापारी सचिन भगवान दायमा यांनी याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. एक बुरखाधारी महिला खरेदीच्या बहाण्याने राजकमल ज्वेलर्समध्ये आली होती, त्यानंतर तिने दुकानात असलेल्या मालक आणि नोकरांची नजर चुकवून शिताफीने एक लाख रुपयांच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरी केल्याच सीसीटीव्ही कैद झालं.