चार वर्षाच्या मुलीस अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणा-या नराधमास 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
1 लाख रूपये दंड न भरल्यास गुन्हा तिन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
बबनराव वाघ|उपसंपादक
चार वर्षाच्या मुलीस आमिष दाखवून पळवुन नेवुन बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना मा . श्री एन . जी . गिमेकर साहेब यांनी दि 27 जुलै रोजी सुनावली.
दिनांक 12/12/2017 रोजी पोस्टे कदिम जालना येथे महिला फिर्यादी यांनी तक्रार दिली की , दिनांक 12/12/2017 रोजी सांयकाळी 6.00 वाजेच्या सुमारास फिर्यादीची 4 वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या भावंडा सोबत गल्लीत खेळत असतांना आरोपी नामे विनोद विक्रम पैठणकर , वय 26 वर्ष , रा . अशोक नगर जुना जालना हा मोटार सायकलवर तेथे आला व पिडीतेस खावुचे आमिष दाखवुन पिडीत मुलगी व तिच्या भावाला मोटार सायकलवर बसवुन मुक्तेश्वर तलाव परिसरात घेवून गेला व पिडीतेच्या भावाला थोड्या अंतरावर ऊभे करुन पिडीत मुलीला पोटात बुक्याने मारहान करुन तिच्यावर बलत्कार केला . या तक्रारी वरुन आरोपी नामे विनोद विक्रम पैठणकर याचे विरुध्द पोलीस ठाणे कदिम जालना येथे गुरनं 490/2017 कलम 376 ( 2 ) ( i ) , 323 भादवी सह कलम 4,5 ( m ) , 6 , 8 बा . लै . अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हयात वरिल नमुद आरोपीस तत्कालीन पो उपनिरीक्ष पल्लवी जाधव कदिम जालना यांनी अटक करुन मा . न्यायालयात पुरावे हस्तगत करुन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते . मा . न्यायालयात सदर गुन्ह्याचे साक्षिपुरावे तपासुन दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुण दिनांक 27/06/2022 रोजी मा . प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना मा . श्री एन . जी . गिमेकर साहेब यांनी आरोपी विनोद विक्रम पैठणकर यास कलम 376 ( 2 ) ( i ) , 323 भादवी सह कलम 4,5 ( m ) , 6 , 8 बा.लै. अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये आरोपीस दोषी धरुन 20 वर्ष सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे .
सदर गुन्ह्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील जयश्री बोराडे यांनी काम पाहिले