जालना जिल्हाराजकारण
अर्जुन खोतकरांचा शिंदे गटाला पाठिंबा; पक्ष सोडताना अश्रु अनावर
जालना/प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे मातब्बर नेते अर्जुन खोतकर यांनी आज शिंदे गटात जात असल्याचा निर्णय घेतला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
परीस्थितीनुसार हा निर्णय घ्यावा लागत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी समर्थन करीत असल्याचे खोतकर यांनी डोळ्यात अश्रू आणून जाहीर केले.
मी निर्णय घेण्याआधी ठाकरेंशी माझ्यावर बेतलेली परीस्थिती बोलून दाखविली.त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण शिंदे गटाचे समर्थन देत असल्याचे त्यांनी आज सांगितले.माझ्यावर ओढावलेल्या परिस्थितीनेच मला शिंदेना मला समर्थन द्यावे लागत असल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली.