व्यापारी महासंघाच्या तिरंगा रॅलीने कुंभार पिंपळगाव शहर झाले तिरंगामय
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी कुलदीप पवार
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त कुंभार पिंपळगाव ता.घनसावंगी येथील व्यापारी महासंघाच्या वतीने रविवारी (दि.१४) रोजी तिरंगा रॅली काढण्यात आली.दरम्यान भारतमातेच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, उपनिरीक्षक संतोष मरळ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटूले, जिल्हा परिषद सदस्य अन्सीराम कंटूले, बाजार समितीचे संचालक अजीम खान पठाण, भरतकाका कंटूले, प्रकाश कंटूले, अतुल बोकन, लक्ष्मणराव कंटूले, शिवाजीराव कंटूले, संदीप कंटूले, ग्रामविकास अधिकारी महादेव रुपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरवात करण्यात आली.या तिरंगा रॅलीला व्यापारी व ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. “भारतमाता की जय, वंदे मातरम..” अशा गगणभेदी घोषणांनी परीसर दुमदुमले निघाले.
यावेळी व्यापाऱ्यांना तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक ते पोलीस चौकी ते अंबड -पाथरी टी पॉईंट पर्यंत काढण्यात आली. यावेळी नरेंद्र तौर, संतोष गबाळे, बालासाहेब हंडे, अन्वर पठाण, हारुन शेख, प्रवीण दहिवाळ, धनंजय कंटूले, अतुल कंटूले, विजय कंटूले, शफीक कुरेशी, भागवत कंटूले, दिनेश लाहोटी, अमित पंडा,पवन राठी, निलेश तौर, शाम राऊत, महेश गुजर, ज्ञानेश्वर तापडिया, राजकुमार वायदळ, रघुनंदन राठी, ज्ञानेश्वर दहिवाळ, कैलास उदावंत,नय्युम आतार, शेख हमीद, गंगाधर लोंढे आदी उपस्थितीत होते.या रॅलीचा अंबड पाथरी टी पाईंट वर राष्ट्रगीताने समारोप झाला. यावेळी पत्रकार बांधव, ग्रामस्थ व व्यापाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली
दरम्यान शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.