मेघालयातून थेट मुळगावी; रावसाहेब दानवेंनी पोळा गावात साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली
भोकरदन ( जालना ) : केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जवखेडा खुर्द या मुळगावी पोळा सण साजरा केला . मंत्री दानवे यांनी गावात पोळ्याच्या सणाला उपस्थित राहण्याची परंपरा कायम राखली आहे .
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देशाच्या मंत्रिपदी पोंहचले आहे . मात्र त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेलीच आहे . ते एक दिवस अगोदर मेघालयात होते तेथून खास शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण असलेल्या पोळा या सणासाठी पूर्ण परिवारासह जवखेडा या लहानशा गावात आवर्जून उपस्थित राहिले आहेत . ग्रामस्थांनी रावसाहेब दानवे व त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्या हस्ते मानाच्या बैलाची पूजा करून पोळा सण साजरा केला .
यावेळी जालना बाजार समितीचे उपसभापती भास्करराव दानवे , आप्पाराव दानवे , मधुकर दानवे , माणिक दानवे , अनिल उबाळे , अमोल शेजुळ यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .