मोसंबी बागाचे तात्काळ पंचनामे करा-सतिष घाटगे
कुंभार पिंपळगाव / प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील भार्डी येथे चेअरमन सतिष घाटगे पाटील यांनी भेट देऊन मोसबी बागाचे फळ गळतीमुळे झालेल्या भागाची पाहनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले सर्व मोसंबी उत्पादकानी पिक विमा भरलेले आहे . व मोसंबीच्या फळबागामध्ये जवळपास ८० % मोसंबीची फळ गळती झालेली असुन शेतकरी पुर्णपणे कोलमडला असुन तरीविमा कंपनी अंत्यत किचकट नियम लावुन फळबागाचा पिक विमा देण्यास टाळाटाळ करु शकतात . तसेच अतिवृष्टी झालेल्या भागात सरकारने सरसगट १५००० रुपये हेक्टरी मदत जाहीर केली असुन अत्यल्प पाऊस झालेल्या घनसावंगी अंबड तालुक्यातील शेतकरी सभ्रमात असुन कमी पाऊसामुळे झालेल्या नुकसानी बद्दल त्यात कोणतेही स्पष्टता नाही त्यामुळे जिल्हातील शेतकरी चिंचींत असुन शिंदे फडणवीस सरकार सवेदंशिल असुन फळगळ झालेल्या मोसंबी उत्पादकाना एकेरी ७५००० हजार रुपये मदत जाहीर करावी तसेच झालेली नुकसान अटीत बसले नाही . तरी विमा कंपनीच्या अटी सिथिल करुन नुकसान भरपाई देण्यात यावी . नसता सर्व शेतकऱ्याला अंदोलन करावे लागेल .यावेळी शेतकरी संघटनेचे काळे सुरेश वाघमारे रावसाहेब , कुढेकर शैलेश , कनके राहुल , डोईफोडे अर्जुन , नखाते अर्जुन , नखाते पांडुरंग , नरोडे गणेश , डोईफोडे रामदास यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते .