जांबसमर्थ येथील मुर्ती चोरी प्रकरणी खा.जाधव यांनी घटनास्थळी दिली भेट
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील पंचधातूच्या सहा मुर्ती चोरी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.या घटनेला तब्बल दहा उलटून गेले तरी अद्यापही पोलिसांना तपासात हाती काहीच लागलेले नाही.याच पाश्र्वभूमीवर परभणीचे खासदार संजय जाधव यांनी बुधवार (ता.३१) रोजी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
खासदार जाधव यांनी श्रीराम मंदिराची पाहणी केली.चोरीची घटना हि अंत्यत दुर्दैवी असून पोलीस या संदर्भात तपास करीत आहेत. पोलीस लवकरच चोरीतील आरोपींचा छडा लावतील ग्रामस्थांनी शांतता बाळगावी व यासंदर्भात कुणालाही काही गुप्त माहिती असेल तर पोलिसांना सांगून सहकार्य करावेत असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी पुजारी धनंजय देशपांडे,पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ,अभय भिंगे,दिपक तांगडे, रामेश्वर तौर,गोपाल तांगडे,डिगांबर वायदळ, मोहन तांगडे,सुदाम गायकवाड, देवकराम मोगरे,महेश तांगडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.