घनसावंगी तालुका
जालना-जांबसमर्थ बस सुरू करण्याची मागणी
रांजणी / प्रतिनिधी
जालना-जांबसमर्थ बस बंद झाल्याने घनसावंगी तालुक्यातील विविध गावांतील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे सदरील बस तात्काळ सुरू करण्याची मागणी प्रवाशामधून होत आहे.
जालना-जांबसमर्थ बस गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. ही बस रामनगर, विरेगांव, कवठा, रांजणी, पांगरा फाटा, जिरडगांव, मासेगांव, कुंभार पिंपलगाव मार्गे जात असल्याने परिसरातील शेकडो प्रवाशांना या बसचा लाभ होत असे. परंतु लॉकडाऊनमुळे ही बस बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच वर्तमान पत्र आणि पोस्टाचे पार्सलही याच बसने येत होते. परंतु बसअभावी वर्तमान पत्र तसेच पोस्टाचे पार्सल विरेगांव किंवा परतूर येथून आणावे लागत आहे. त्यामुळे जालना-जांबसमर्थ बस तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.