घनसावंगी तालुका
रब्बी पिकांची नोंदणी करण्याची तहसीलदार घनसावंगी यांची सूचना
घनसावंगी :प्रतिनिधी
शासनाने नव्याने सुरू केलेल्या ई पीक पाहणी अँपला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. घनसावंगी तालुक्यातील सुमारे 40 हजार शेतकऱ्यांनी आपल्या खरीप पिकाची नोंदणी या अँपमध्ये केली. आता शासनाने रब्बी पिकाची नोंदणी करण्याची सुविधा देखील या अँपमध्ये दिली आहे.
खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिके देखील मोठ्या प्रमाणात यावर नोंदवावीत, अशी सूचना तहसीलदार कविता गायकवाड यांनी केली आहे. या माध्यमातून शेतकरी स्वतःचा पीक पेरा नोंदवून ते डाऊनलोड करून घेऊ शकतो. याप्रमाणे मिळवलेले पेरा प्रमाणपत्र हे ग्राह्य असून यासाठी तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी या सुविधेचा वापर करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.