जालना जिल्हाब्रेकिंग बातम्यामराठावाडा

जालना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून महत्वाचा मॅसेज

जालना प्रतिनिधी :
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिनांक ०२/०९/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वा. दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दिनांक ०२/०९/२०२४ रोजी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे

images (60)
images (60)

व दिनांक ०३/०९/२०२४ रोजी यलो (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी ३०-४० कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच दिनांक ०४/०९/२०२४ ते ०६/०९/२०२४ या कालावधीत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय,जालना यांच्यावतीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!