घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यातील महावितरण पॉवरफुल,२० तासापासून लाईट गुल !

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांनी रात्र काढली अंधारात

कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव सह परीसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. शनिवारी सायंकाळी तीन वाजता कुंभार पिंपळगाव सह परीसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

वीस तास पेक्षा जास्त कालावधी उलटून गेले तरी अद्यापपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही.विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.ग्रामस्थांची दळण वळण पाणी दैनंदिन कामकाज बिघडले.तर केव्हा वीज पुरवठा सुरळीत होईल याबाबत मात्र अद्यापही विजवतरण कडून अधिकृत सांगण्यात येत नाही.यामुळे ग्रामस्थांतुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे

रात्रभर वीज नसल्याने ग्रामस्थांना रात्रभर अंधारात काढावी लागली. लाईट नसल्याने ग्रामस्थांना मच्छरांशी सामना करावा लागला. पाणी दळण मोबाईल बंद इ सेवा बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल झाले. वीज पुरवठा त्वरित सुरळीत करण्यात येण्याची मागणी व्यापारी बांधवासह ,ग्रामस्थांतुन होत आहे.

“घनसावंगी येथून ३३ केव्ही तालुक्यात विज पुरवठा केला जातो.म.चिंचोली येथे अचानक ब्रेकर नादुरुस्त झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला काम सुरू असून लवकर विद्युत पुरवठा सुरळीत चालू होईल”

प्रदीप कांबळे सहाय्यक अभियंता कुंभार पिंपळगाव

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!