घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगाव येथील अनेक कंपन्यांचे नेटवर्क गुल
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
रेंज वारंवार गायब होत असल्याने ग्राहक संतापले
कु़ंभार पिंपळगाव येथे विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल व सिमकार्ड वापरणारे हजारो ग्राहक आहेत.असुन अडचण नसून खोळंबा अशी गत निर्माण झाली आहे.भरमसाठ पैसे मोजूनही ग्रामीण भागात मोबाईलला तासन तास रेंज गायब होत असल्याने रेंज अभावी मोबाईलचा वापर कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे
ग्राहक संतापले आहेत.घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून खाजगी कंपनीच्या रेंज गुल होत असल्याने ग्राहक वैतागले आहेत.काही नेटवर्क हे विद्युत उपकरणांवर चालत असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला तर तासभर रेंज गायब होत असते.याकडे संबंधित कंपन्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे