भोकरदन तालुका

भाजपाच्या कार्यकर्त्यांकडुन जमावबंदीच्या कायद्याचे उल्लंघन,७० कार्यकत्यांवर गुन्हा दाखल

भाजपच्या तालुकाध्यक्षासह जवळपास 70 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

images (60)
images (60)

मधुकर सहाने : भोकरदन

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून भोकरदन येथे भाजपच्या वतीने आंदोलन केल्याप्रकरणी भाजपच्या तालुकाध्यक्षासह जवळपास 70 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जालना जिल्हातील भोकरदन येथे रविवारी 21 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर राज्याच्या गृहमंत्र्या विरुद्ध निदर्शने आंदोलन करण्यात आले . वास्तविक सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केलेला आहे . असे असतांनाही आदेशाचे
उल्लंघन करत भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठया संख्येने प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते जमवले व तासभर निदर्शने व रास्ता रोको आंदोलन केले . दरम्यान , जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी राजेंद्र देशमुख , गणेश फुके , विजय कड , दीपक जाधव , सतिष रोकडे , दीपक मोरे , भगवान गिरणारे , ज्ञानेश्वर पुंगळे , चंद्रकांत साबळे , सुभाष दळवी यांच्यासह ६५ ते ७० जणांवर पोलीस अंमलदार भाऊसाहेब जनार्दन लहाने यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठाणे अंमलदार विनोद भिवसने यांनी सांगितले .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!