कुंभार पिंपळगाव गावात नागरीकांचा सर्रास विनामास्क वावर !
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई ची गरज
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव हे बाजारपेठेचे मुख्य गाव आहे. परीसरातील ४० गावातील नागरिक हे आर्थिक देवाण-घेवाण व खरेदीसाठी बाजारात येत असतात.
एकीकडे जिल्ह्यातील कोरोणा रुग्ण संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असताना कुंभार पिंपळगाव बाजार पेठेत मात्र दुचाकी वाहन धारक पादचाऱ्यांसह बेजबाबदार नागरिक हे खुलेआम विनामास्क फिरताना आढळत आहे.जणू त्यांना कोरोणा महामारीचा विसर पडल्याचे दिसत आहे.
जिल्हात कलम १४४ जमाव बंदी आदेश लागू असताना येथील मुख्य सार्वजनिक ठिकाणी व चौकात आदेशाचे उल्लंघन होताना दिसत आहे.बहूतांश नागरिक हे
विनामास्क वावरत आहेत.त्यांना मास्क वापरण्याची ॲलर्जी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
महसूल व पोलीस प्रशासन विनामास्क खुलेआम फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची अत्यंत गरज आहे.