नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी। अखिल भारतीय मराठा महासंघ घनसावंगी ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नुकसानीचे तअखिल भारतीय मराठा महासंघ घनसावंगी ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी।
घनसावंगी / नितीन तौर : गत चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी हंगामातील शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता – तोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा हिरावून घेतला आहे. नुकसान ग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी मराठा महासंघ घनसावंगी तालुक्याच्या वतीने करण्यात आली असुन.
या संदर्भात गुरवार ( ता. २५) तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या लेखी निवेदनात मराठा महासंघाचे घनसावंगी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण यादव पाटील यांनी म्हंटले आहे,अतिवृष्टीने रब्बी हंगामातील गहू, ज्वारी,हरबारा, या पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी महत प्रयासाने गहू, ज्वारी, हरभरा, ह्या पिकांना पोटच्या गोळ्या सारखे जगवले. मात्र निसर्गाचे दुष्ट चक्र पुन्हा एकदा बळीराजा च्या पाठीशी लागले असून घनसावंगी तालुक्यातील बहुतांश भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळवल्या.द्राक्ष, मोसंबी, पपई या फळबागांचेही नुकसान झाले. दरम्यान कोरोना संक्रमण काळात शेतमालास मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई दिली जावी.
अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ घनसावंगी तालुक्याच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मराठा महासंघ घनसावंगी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण यादव, युवक तालुकाध्यक्ष गणेश गदम, साहेबराव वाघ, गजानन जाधव, राजेंद्र अटकळ, रामेश्वर जाधव, रामेश्वर मोटे व आदिच्या नेवेदना वर स्वाक्षऱ्या आहेत