घनसावंगी तालुका

शिवनगाव येथे माजी आमदार यांच्या हस्ते विम्याची रक्कम नातेवाईकांना वितरीत

images (60)
images (60)

प्रतिनिधी:नितीन तौर

घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथिल शेतकरी सुधाकर दुधाजी मोरे यांचा गोदावरी नदीत बुडून अपघाती मृत्यू झाला होता.यावेळी माजी मंत्री राजेश भैय्या टोपे यांच्या सहकार्याने व सरपंच शकुंतला विजयकुमार तौर यांच्या पाठपुराव्याने स्व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना मिळवून देण्यात आली व आज उक्कडगाव येथे माजी मंत्री राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते दोन लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला.

सुधाकर मोरे हे शेती सोबतच,ऊसतोडणी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते मात्र त्यांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट झाली होती मात्र स्व गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजनेची मदत मिळाल्याने मोरे कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आहे.यावेळी उक्कडगाव सरपंच परमेश्वर तौर,विजयकुमार तौर,राहुल तौर, नितिनराजे तौर, धनंजय मोरे सह गावकरी उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!