जालना क्राईम

शेतीच्या वादातुन वालसा वडाळा येथिल कुटुंबावर जिवघेणा हल्ला,१० जनांवर गुन्हा दाखल

मया बापाला दवाखान्यात न्या,चिमुकल्याचा टाओ

images (60)
images (60)

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथील शेतकरी रामदास सुपडा इंचे व त्यांच्या भावांची वालसा वडाळा शिवारात गट क्रमांक 147 मध्ये सहा एकर शेती असून न्यायालयात त्या शेतीचा गावातीलच रामदास गणपत पंडित यांच्या कुटुंबासोबत वाद सुरू आहे.

दरम्यान, बुधवार दि 24 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास इंचे कुटुंब काम करत असताना पंडित कुटुंबातील सदस्यांनी इंचे यांच्या शेतात ट्रॅक्टर द्वारे नांगरणी सुरू केली असता दोन्ही कुटुंबात वाद झाला व पंडित कुटुंबाने इंचे यांच्या कुटुंबावर लोखंडी पाईप ने हल्ला करून गंभीर जखमी केले.
दरम्यान,अंजना रामदास इंचे यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात अट्रोसिटी सह इतर कलमांतर्गत दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत भोकरदन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,आम्ही शेतात कापूस वेचणी व मिरच्या तोडण्याचे काम करीत असताना रामदास पंडित यांनी आमच्या शेतात नांगरणी करण्यास ट्रॅक्टर आणले तेव्हा आम्ही त्यास विरोध केला असता रामदास गणपत पंडित,गणपत संपत पंडित,महादू गणपत पंडित,गजानन गणपत पंडित,विष्णू गणपत पंडित,व त्यांच्या पत्नी यांनी लोखंडी पाईप तसेच लाथा बुक्क्यांनी रामदास सुपडा इंचे,भीमराव सुपडा इंचे,भास्कर नारायण इंचे,सुशीला बाई भीमराव इंचे,शारदाबाई शामराव इंचे, रामेश्वर भगवान इंचे,मंगलाबाई भगवान इंचे,सुनीता रावसाहेब इंचे यांना जबर मारहाण केली.तसेच मांग टयानो तुम्हाला जीवच मारतो म्हणून हल्ला केला तसेच अश्लील शिवीगाळ ही केली.

मारहाण झाल्यानंतर तात्काळ भोकरदन पोलीस ठाण्यात आले व तेथून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात इंचे कुटुंबातील सदस्यांना दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून हाता पायाला तर काहींच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असुन भोकरदन पोलीस ठाण्यात पंडित कुटुंबातील जवळपास 10 जणांवर अट्रोसिटी सह 307,324,323,504,506,120(ब),143,147,148,149,294 भादवी आदी कलमा सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे हे करणार आहेत.

मया बापाला दवाखान्यात न्या,चिमुकल्याचा टाओ

भास्कर इच्चे यांना या हल्ल्यामध्ये जबर मार लागला आणि ते जमिनीवर कोसळले,तर त्यांचा मुलच्या तोंडुन एकच टाहो निघत होता की “माझ्या बापाला दवाखान्यात न्या माझ्या बापाला दवाखान्यात न्या”शेतीच्या वादातुन या झालेल्या घटनेमुळे परिसरात रोष निर्माण झाला असुन दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!