जालना क्राईम

रात्री गाड्या अडवुन चोरी करणारी टोळी तालुका पोलीसांनी केली गजाआड.

बबनराव वाघ, उपसंपादक

images (60)
images (60)

जालना परीसरातील कन्हैयानगर ते जामवाडी दरम्याण रात्रीच्या वेळी ट्रक व इतर गाड्या आडवुन चोरी करणा-या ठोळीने धुमाकुळ घातला होता.याची टोळीतील चार जनांना तालुका पोलीसांनी बेडया ठोकल्या.

जालना येथुन देवळगाव राजा कडे जाणा-या ट्रकला गुरुवारी सकाळी अडीच वाजे दरम्याण कन्हैयानगर ते जामवाडी दरम्याण असलेल्या पुलाजवळ पाच जनांनी अडवून लुटल्याची घटना घडली.

याची वेळी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजी वडते व सहकारी वाघ्रुळ येथुन रात्रीची गस्त घालुन परतले असता ट्रक चालकाने घडलेला सर्व प्रकार त्यांनी सांगीतला. यावर वडते व सहका-यांनी आपले सरकारी वाहन बाजुला लावून खासगी वाहनाने घटनास्थळाकडे गुप्त शाखेच्या कर्मचार्यांच्या सोबत रवाना झाले तर त्यांना एक जन आढळून आला व चौकशी केली असता इतर चार जन राजू खरात, शुभम लहू जाधव, किरण संजू सरकटे आणि सागर बाबुराव गंगावणे यांना अटक केली. तर प्रमुख आरोपी हा फरार असल्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!