कुंभार पिंपळगावात कोरोणा लसीकरणाला सुरूवात!
पहिल्या दिवशी ७० जणांनी टोचली लस
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसांवगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नुतन वसाहत येथे कोरणा प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या सत्रात ७० जणांनी लस घेतली. कुंभार पिंपळगाव परिसरातील गावातील ग्रामस्थांनी लस टोचून घेतली.
पंचायत समितीचे सभापती भागवत रक्ताटे यांच्या हस्ते लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपसभापती बन्शीधर शेळके, जिल्हा परिषद सदस्य अन्शीराम कंटुले,अन्वर पठाण,सोनाजी कंटुले, धनंजय कंटुले,बंडू कंटुले, संदिप कंटुले, वैद्यकीय अधिकारी दीपाली चव्हाण-राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. ढवळे ,आरोग्य सेवीका उर्मिला वळसे, ए एम खान, आरोग्य सेवक एस एम चव्हाण,ई एस पोपळघट, औषध निर्मिता योगेश काटकर,आदींनी परिश्रम घेतले.
या केंद्रावर ग्रामस्थांनी सकाळ पासून लसीकरणासाठी गर्दी केली होती. आठवड्यातील तीन दिवस लसीकरण होणार आहे. यात बुधवार, शुक्रवार ,सोमवार ह्या तीन दिवशी लसीकरण होणार आहे. यावेळी आशा वर्कर सारिका भंडारी ,उषा टेकाळे, अर्चना संघवी, रामनाथ नागवे, एस जी मदने, परमेश्वर गाढेकर यांनी परिश्रम घेतले.
नागरिकांनी लस घेतली म्हणजे कोरोणा होणार नाही असे समजून लस घेतली तरीपण कोरोणाचे नियम पाळावेच लागतील मास्क वापरणे वारंवार हात धुणे, गर्दी टाळणे, सामाजिक आंतर राखणे, अधिनियमाचे काटेकोरपणे पालन करावे
दीपाली चव्हाण-राठोड
वैद्यकीय अधिकारी कुंभार पिंपळगाव