घनसावंगी तालुका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी व धूलीवंदन सण घरातच साधेपणाने साजरे करा
कुंभार पिंपळगाव (प्रतिनिधी)
घनसावंगी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांनी कोरोणाचा पार्श्वभूमीवर वाढता संसर्ग लक्षात घेता, होळी व धूलीवंदन सार्वजनिकरित्या साजरा करू नये,प्रत्येकाने घरातच अथवा घरासमोर साजरे करावेत,असे आवाहन पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी केले आहे.
रविवार व सोमवारी होळी व धूलीवंदन हे सण आहेत.या उत्साहात एकमेकांवर रंग टाकणे,पाणी टाकणे, रंगाची उधळण केली जाते परंतु सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलीस स्टेशन हद्दीत होळी व धूलीवंदन हे सार्वजनिक रित्या साजरे न करता आपण आपल्या घरामध्ये व घरासमोर साजरी करावी, सध्या जिल्ह्यामध्ये
जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश लागू असून,एकत्र जमवू नये,असे आवाहन कुंभार पिंपळगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक शिवसींग बहूरे यांनी केले आहे.