घनसावंगी तालुका

जांबसमर्थ येथील आरोग्य उपकेंद्रात मंगळवारपासून कोरोना लसीकरण


कुंभारपिंपळगाव/कुुलदीप पवार

images (60)
images (60)

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार जांबसमर्थ ता.घनसावंगी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (दिं.06) कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.त्यात आठवड्यातल्या पहिल्या मंगळवारी जांबसमर्थ व उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील 45 वर्षावरील नागरिकांना सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सोबत घेऊन यावे असे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली चव्हाण- राठोड व उपकेंद्राचे अधिकारी डॉ.कृष्णा कोकणे यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!