घनसावंगी तालुका

पारडगाव शिवारात उसाच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड करणाऱ्या आरोपीस शेतामध्ये गांजाच्या झाडांसह घनसावंगी पोलिसांनी घेतले ताब्यात

images (60)
images (60)

घनसावंगी/नितीन तौर

पारडगाव ते परतुर रोडवर पारडगाव शिवारात शेत गट क्र . २५० मध्ये उसाच्या शेतात ईसम नामे सोमनाथ प्रभाकर चोरमारे याने गांजाच्या झाडाची लागवड केली आहे .
घनसावंगी पोलीस स्टेशन ला गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक बंटेवाड यांनी सदर माहिती वरिष्ट अधिकारी यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रेडकामी मा . तहसिल कार्यालय घनसावंगी येथील नायब तहसिलदार मोरे , तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथील मंडळ अधिकारी कोरडे , तसेच नगर पंचायत घनसावंगी येथील दोन शासकीय पंच व वजमापे करणारे किराणा दुकानदार , फॉरेन्सिक व्हॅन जालना येथील कर्मचारी खलसे यांना बोलावून पोलीस ठाणे घनसावंगी येथील पोलीस स्टॉफसह पारडगाव शिवार शेत गट क्र . २५० मधील उसाच्या शेतात दि .३ शुक्रवार रोजी दुपारी ४:०० वाजता छापा मारला असता सदरील ठिकाणी सोमीनाथ प्रभाकर चोरमारे वय २६ वर्षे रा . पारडगाव हा मिळून आला .

उसाच्या शेतात अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली असता उसाच्या शेतात लहानमोठी ७४ गांजाची झाडे मिळून आले . सदर झाडांचे पंचासमक्ष वजनमापे काट्यावर वजन केले असता सदर झाडे हि ४३ किलो वजनाची ज्याची किंमत अंदाजे ४,३०,००० / – रूपयाची झाडे मिळून आली . त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने सदर शेत हे बटाईना केल्याचे सांगीतले व मुळ मालक जयश्री भगवान मापारे रा . सावंगी जि.जालना असल्याचे सांगितले . त्यावरून मिळून आलेली ४३ किलो वजनाची एकुण लहान मोठी ७४ गांजाची झाडे जप्त करून आरोपी नामे सोमनाथ प्रभाकर चोरमारे रा . पारडगाव यास ताब्यात घेण्यात आले .

त्यावरून मौजे पारडगाव शिवारात शेत गट क्र . २५० मधील बटाईने केलेल्या उसाच्या शेतात स्वत च्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशिररित्या गांजा सदृश्य झाडाची लागवड करून संवर्धन व जोपासना केली म्हणून आरोपी नामे सोमिनाथ प्रभाकर चोरमारे वय २६ वर्षे रा . पारडगाव ता.घनासावंगी व शेत मालक यांच्या विरूध्द कलम २० अमली औषधी द्रव्ये व मन प्रभावी पदार्थ अधीनियम १ ९ ८५ ( N.D.P.S. ) प्रमाणे पोलीस ठाणे घनसावंगी येते गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक विनायक देशमुख साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड , पोलिस उपनिरीक्षक माने , पो ना चव्हाण , पोलीस नाइक राठोड , पो.कॉ. खटावकर , पो.कॉ. खरात , पो.कॉ. वैराळ , पो.कॉ. देशमाने , पो.कॉ. जाधव , पो.कॉ. गायकवाड , पो.कॉ. वैद्य , मपोकॉ राठोड यांनी केली आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!