जालना जिल्हा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावुन घेण्यासाठी पाठपुरावा डॉ. जब्बार पटेल यांची माहिती


जालना (प्रतिनिधी) ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ठ करुन निवृत्ती वेतन लागु करावे यासाठी न्यायालयासह राज्यशासनाकडे पाठपुरावा केला जात असून या लढ्याला लवकरच यश मिळेल अशा विश्‍वास हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त कर्मचारी समितीचे सदस्य डॉ. जब्बार पटेल यांनी येथे बोलतांना व्यक्त केला. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली असता कर्मचाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी  डॉ. जब्बार पटेल पुढे  म्हणाले की, अनेक वर्षापुर्वी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी हे सरकारी कर्मचारी  म्हणुन गणले जात होते. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना देखील मिळत होते. परंतु नंतरच्या काळावधीत  बाजार समिती कर्मचाऱ्यांना असलेले शासकीय कवच काढून घेण्यात आले. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर बाजार समिती कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्ती वेतन मिळत नाही. सदर निवृत्ती वेतन पुर्ववत लागू करावे तसेच बाजार समिती कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देवून  शासकीय सेवेत समाविष्ठ करावे यासाठी न्यायालयासह राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले. तसेच बाजार समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत यासाठी देखील पाठपुरावा सुरु असल्याचे पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.  प्रारंभी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी डॉ. जब्बार पटेल यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देवून  सत्कार केला. यावेळी प्रभाकर जाधव, मोहन राठोड, अनिल खंडाळे, संजय छबीलवाड, प्रसाद काकडे, रामेश्‍वर चिनके, राजू निहाळ,तसेच माजी सचिव सुधाकर इंगळे, पंडितराव जाधव, तुळशीराम चव्हाण,श्रीरंग हंडे, सुभाष जाधव  व इतर  कर्मचारी उपस्थित होते.  

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!