घनसावंगी तालुका

आजपासून जांबसमर्थ येथे कोरोना लसीकरणाला सुरूवात

पहिल्याच दिवशी १२० जणांना टोचली लस

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना लसीकरणाला दि.६ मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली.४५ वर्षांवरील नागरीकांनी
सकाळी दहा ते चार या वेळेत पहिल्याच दिवशी १२० जणांनी कोरोनाची लस घेतली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ दिपाली चव्हाण-राठोड, उपकेंद्राचे डॉ कृष्णा कोकणे, पंचायत समिती सदस्य सुशील तांगडे, सरपंच बाबासाहेब तांगडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब तांगडे,संघानंद गणकवार,राजेंद्र तांगडे, एकनाथ तांगडे,आरोग्यसेविका छाया मेश्राम,आरोग्यसेवक शिवदास चव्हाण,योगेश काटकर,अनिता गलबे,आशा आव्हाड, स्वयंसेविका सुदामती गणकवार,यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Open chat