रावेर येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचा खून;हल्ल्याचा तीव्र निषेध
पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना निवेदन देताना पत्रकार
कुंभार पिंपळगाव /कुलदीप पवार
अहमदनगर जिल्ह्यातील रावेर येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.दोषी गुन्हेगार आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्याकडे (दि.९) शुक्रवार रोजी पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले की, अहमदनगर जिल्ह्यातील रावेर येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्यावर समाजातील काही अमानूष गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अपहरण करून प्राणघातक खून करण्यात आला आहे.सदरील घटना हि निंदणीय असून पत्रकारांवर दबाब निर्माण करण्यात येत आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून,मात्र समाजातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अशा घटनेत वाढ होत आहे.
सदरील घटनेतील दोषी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी,असे शेवटी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग बहूरे, पोलीस हवालदार रामदास केंद्रे यांची उपस्थिती होती.निवेदनावर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर,विष्णू आर्दड, रामेश्वर लोया, कौतिक घुमरे, गणेश ओझा, अनिल गायकवाड,अजय गाढे, नागेश शिंदे, संभाजी कांबळे, किशोर शिंदे,भागवत बोटे, विष्णू व्यवहारे,शेख सोहेल, अशोक काळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.