जालना जिल्हा

जालना जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाकडुन नविन सिंचन विहिरीसाठी 917 लाभार्थ्यांची निवड

images (60)
images (60)

    जालना दि. 9 (न्यूज ब्युरो) :-   कृषि विभागाने महाडिबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतक-यांच्या सोईकरीता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासुन ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मीक संगणीकीय प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीद्वारे शेतक-यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीचे निवडीचे स्वातंत्र देण्यात आले होते. त्यानुसार राबवण्यिात येणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुसुचित जाती, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अनुसुचित जमाती, राष्ट्रीय कृषि विकास योजना अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, सन 2020-2021 या योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड शासन स्तरावर संगणकीय सोडतीद्वारे दि. 7 एप्रिल 2021  रोजी पार पडली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन  योजनेसाठी रुपये 1900.00 लाख, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी रुपये 73.85 लाख व राष्ट्रीय कृषि विकास योजना रुपये 302.40 प्राप्त झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन  योजना अनुसुचित जाती योजने अंतर्गत 701 नविन सिंचन विहिरी, 244 जुनी विहिर दुरुस्ती, 143 इनवेल बोरींग व इतर लाभ मिळुन 1600 लाभार्थ्यांची तर बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अनुसुचित जमाती योजने अंतर्गत्‍ 1 नविन सिंचन विहिरी, 37 जुनी  विहिर दुरुस्ती, 4 इनवेल बोरींग व इतर लाभ मिळुन 106 लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजना अनुसुचित जाती योजने अंतर्गत 154 नविन सिंचन विहिरी तर राष्ट्रीय कृषि विकास योजना अनुसुचित जमाती योजने अंतर्गत 61 नविन विहिरीचा या घटकांसाठी निवड झालेली आहे.
     या योजने अंतर्गत संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरी पध्दतीने ज्या शेतक-यांना निवडीचे लघु संदेश एस.एम.एस. प्राप्त झाले असतील त्या शेतक-यांना आपला संगणकीकृत सातबारा, संगणकीकृत 8 अ, सक्षम अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे जात प्रमाणपत्र, ग्रामसभेचा ठराव, स्वाक्षरीत कुटूंब प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांनी त्यांच्या युजर आय.डी. आणि पासवर्ड सहाय्याने htt[s://mahadbtmahait.gov.in/farmer/login या संकेतस्थळावर तातडीने अपलोड करावीत कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच पुर्व समिती ऑनलाईन पध्दतीने  मिळणार आहे. अंतीम निवड झालेल्या लाभार्थ्यांना पुर्ण कामाचे मापण पुसतीकेत नोंद करुन त्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरीत करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

     ज्या शेतक-यांना निवडीचे लघु संदेश एस.एम.एस. प्राप्त झाले असतील त्या शेतक-यांनी वरील प्रमाणे कार्यवाही तातडीने करावी असे आवाहन जालना जिल्हा परिषदेच्या  कृषि  सभापती प्रभाताई गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, कृषि विकास अधिकारी भिमराव रणदिवे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!