जालना जिल्हाजिल्हा गुन्हेगारी बातमी

जालन्यात पोलिसांचा अचानक छापा! माळीपुऱ्यात तरुणाकडे गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतूस; ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

जालना | न्यूज जालना वृत्तसेवा

येथे जाहिरात द्या न्यूज जालना प्रतिनिधी भरती व्यवसायाची जाहिरात दिगंबर गुजर न्यूज जालना

जालना शहरातील माळीपुरा परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या इसमाला कदीम जालना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयिताकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय माहिती अन् पोलिसांची तत्काळ कारवाई!

सोमवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे व तपास पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माळीपुरा परिसरात एक इसम गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. यावेळी संशयित नाजिम अय्युब शेख (वय ४०, रा. सुंदरनगर, चंदनझिरा, जालना) याला ताब्यात घेण्यात आले.

४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी संशयिताकडून अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६१०/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३ सह २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबिर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस कर्मचारी तसेच तपास पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलीस ठाणे करीत आहे.

न्यूज जालना | सत्य बातमी, निर्भीड पत्रकारिता

न्यूज जालना YouTube व्हिडिओ

News Jalna YouTube चॅनेलला भेट द्या

न्यूज जालना Facebook पेज

NEWS JALNA — एकूण बातमी पृष्ठ भेटी1,100,625
बातमीचे वर्तमानपत्र स्वरूप
NEWS JALNA
आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या

जालन्यात पोलिसांचा अचानक छापा! माळीपुऱ्यात तरुणाकडे गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतूस; ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

जालना | न्यूज जालना वृत्तसेवा

जालना शहरातील माळीपुरा परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या इसमाला कदीम जालना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयिताकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय माहिती अन् पोलिसांची तत्काळ कारवाई!

सोमवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे व तपास पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माळीपुरा परिसरात एक इसम गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. यावेळी संशयित नाजिम अय्युब शेख (वय ४०, रा. सुंदरनगर, चंदनझिरा, जालना) याला ताब्यात घेण्यात आले.

४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी संशयिताकडून अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६१०/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३ सह २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबिर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस कर्मचारी तसेच तपास पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास कदीम जालना पोलीस ठाणे करीत आहे.

न्यूज जालना | सत्य बातमी, निर्भीड पत्रकारिता

ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद • newsjalna.com

मोठी बातमी असल्यास इमेज लांब होऊ शकते. संपूर्ण मजकूर या इमेजमध्ये समाविष्ट केला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!