आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी
जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्हा व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवार रोजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. शहरातील मस्तगड भागात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आ. कैलास गोरंट्याल यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अ. भा. कॉ. कमिटीचे सदस्य भिमराव डोंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेद्र राख, शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, न. प. गटनेते गणेश राऊत, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नगरसेवक अरुण मगरे, किशोर गरदास, बालकृष्ण कोताकोंडा, संगीता पाजगे, राजेश काळे, अशोक उबाळे, धर्मा खिल्लारे, चंद्रकांत रत्नपारखे, मिर्झा अन्वर, नंदा पवार, फकीरा वाघ, गणेश चौधरी, अरुण घडलिंग, विजय बनकर, शिवप्रसाद चितळकर, रहिम तांबोळी, गणेश वाघमारे, वैभव उगले, जॉर्ज उगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.