घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगावात नियमांची ऐशीतैशी; रस्त्यावरील वाहनांकडे दुर्लक्ष
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व परीसरात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.शासनाकडून दिलेल्या नियमांची नागरीकांंनी पायदळी तुडवीत बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून येते.काही नागरिक मास्कचा वापर करतात, तर काही नागरीक रस्त्यावर विनामास्क विनाकारण फिरत असतात.कुंभार पिंपळगाव हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे .परीसरातील नागरीकांनी भाजी पाला तसेच किराणा खरेदीसाठी दुकांनावर येत असतात.मात्र याठिकाणी सुरक्षित अंतराचे पालन केले जात नाही. तसेच येथील मुख्य रस्त्यावर वाहतूकीचे वाहने अत्याव्यस्त अवस्थेत दुचाकी व चारचाकी वाहने उभी असतात.यामुळे रस्त्यावर वारंवार वाहतूकीत कोंडी निर्माण होते.याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.