जालना जिल्हादिवाळी अंक २०२१

गावनिहाय ग्राम दक्षता समित्या गठीत करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश

जालना दि. 17 (न्यूज जालना):- जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रविंद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, पोट कलम 2 (अ) नुसार जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी दि. 1 एप्रिल 2021 पासुन लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या कामाला गती देण्यासाठी जिल्हादंडधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रविंद्र बिनवडे यांनी गावनिहाय ग्रामदक्षता समिती एक आदेशाद्वारे गठीत केली आहे. या समिती मध्ये अध्यक्ष म्हणून त्या-त्या गावचे संरपच, तर सदस्य म्हणून मुख्याधापक, शिक्षक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ता, तलाठी, कृषी सेवक, बी.एल.ओ., अंगणवाडी सेविका तर सदस्य सचिव ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी राहणार आहे.

images (60)
images (60)

तसेच समितीची जबाबदारी कोविड लसीकरण करुन घेण्यासाठी गावकऱ्यांचे प्रबोधन करुन त्यांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रवृत्त करणे आणि 45 वर्षावरील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण करणे, कोविड रुगणांचे निकट संपर्क शोधुन त्यांना RT-PCR /RAT चाचणी करुन घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मदत करणे, ताप, सर्दी, खोकला, घशाला खवखव, ILI/SARI ( श्वसनाचे आजार ) असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी गठीत केलेल्या पथकांना मदत करणे या जबाबदारी समिती करणे आवश्यक राहील तसेच कामकाजामध्ये दिरंगाई, हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समुह यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. तर कामकाजमध्ये दिरंगाई, हजगर्जीपणा अथवा निष्काळजीपण करणाऱ्या सरपंच विरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार अपात्रतेची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येईल यांची नोंद घ्यावी तसेच ग्राम दक्षता समितीला उपरोक्त जबाबदारी, कार्य पार पाडयासाठी सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांनी सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण , जालना रविंद्र बिनवडे यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!