एप्रिल सत्राची जे ई ई परीक्षा लांबणीवर.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. अनेक राज्यातील विद्यार्थांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात आलं आहे. तर काही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच भर पार्ष्वभूमिवर राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीद्वारा एप्रिलअखेर घेण्यात येणारी जेईई परिक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.
एनटीए ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सुचना प्रकाशीत केली आहे. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही याबाबत माहिती दिली.
परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची नवी तारीख किमान 15 दिवस आगेदर जाहीर केली जाणार असल्याचे ‘एनटीएन’ने आपल्या निवेदनात नमूद केलेले आहे.
नियोजित वेळापत्रका प्रमाणे जेईई मेन 2021 वर्षातील, एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलअखेर घेण्यात येणारी जेईई ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे