जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा वाढला उच्चांक
आज एकाच दिवशी 145 व्यक्तिंचा अहवाल पॉझिटिव्ह
घनसावंगी/नितीन तौर
घनसावंगी तालुक्यात आज एकाच दिवशी 145 कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.कोरोनाचा वेग शहरी भागासह ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असून नागरीकांनी सावधानता बाळगून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्राप्त अहवालानुसार घनसावंगी शहर 25,अंतरवाली दाई 1, अरगडे गव्हाण 1,बानेगाव 1, बेलवाडी 2, पाडोळी 1,भारडी 1,भायगव्हाण 1,बोडखा 7,बोलेगाव 1,बोररांजणी 1,चापडगाव 2,देवीदहेगाव 4,गुंज 2,हिस्वन 4,जांबसमर्थ 6, जांब तांडा 1,जिरडगाव 13,कंडारी 2,खालापूरी 1, कुंभार पिंपळगाव 20,लिंबी 1,लिंबोणी 1,म.चिंचोली 8,मांदळा 1,मंगूजळगाव 2,मुर्ती 5,पाडोळी 6,पानेवाडी 1,राजेगाव 6,राणी उंचेगाव 2, रांजणी 1,साळेगाव 3,तिर्थपूरी 6 वडीरामसगाव 2,विरेगाव तांडा 1,येवला 3 अशा एकुण 145 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.